नदीपात्रात उतरलेला युवक गेला वाहून; तिसऱ्या दिवशी आढळला मृतदेह!, मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाले तुडूंब भरून वाहत आहेत. १८ ऑगस्ट रोजी उतावळी नदीच्या पात्रात भोसा येथील धनराज भिकाजी हांडे (२८) वाहून गेला होता. काल, २० ऑगस्टला सकाळी उतावळी नदीचे पाणी कमी होऊन नदी पात्रात झाडाच्या खोडाला त्याचा मृतदेह आढळला. वागदेव येथील बहिणीच्या …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दोन- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाले तुडूंब भरून वाहत आहेत. १८ ऑगस्ट रोजी उतावळी नदीच्या पात्रात भोसा येथील धनराज भिकाजी हांडे (२८) वाहून गेला होता. काल, २० ऑगस्टला सकाळी उतावळी नदीचे पाणी कमी होऊन नदी पात्रात झाडाच्या खोडाला त्‍याचा मृतदेह आढळला.

वागदेव येथील बहिणीच्या घरून बैलजोडी आणण्यासाठी जाताना उतावळी नदीच्या पात्रात धनराज उतरला होता. मात्र अचानक पाण्याचा ओढा वाढला आणि तो वाहून गेला होता. नदी पात्रात झाडाच्या खोडाला मृतदेह दिसून येताच धनराजचा भाऊ रघुनाथ भिकाजी हांडे याने त्‍याला ओळखले. जानेफळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रल्हाद टकले, पोलीस कॉन्स्टेबल विनोद फुफाटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपास प्रल्हाद टकले करीत आहेत.