धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रोहिणखेड (ता. मोताळा) गावाजवळ आज, २ सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. कृष्णा गरुडे (१८, रा. रोहिणखेड ता. मोताळा) हा त्याच्या दोन मित्रांसह बुलडाण्यावरून रोहिणखेडकडे जात होता. धावती मोटारसायकल खड्ड्यात आदळल्याने मागे बसलेला कृष्णा पडला. यात त्याच्या हात पाय व डोक्याला गंभीर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रोहिणखेड (ता. मोताळा) गावाजवळ आज, २ सप्‍टेंबरला सायंकाळी पाचच्‍या सुमारास घडली.

कृष्णा गरुडे (१८, रा. रोहिणखेड ता. मोताळा) हा त्याच्या दोन मित्रांसह बुलडाण्यावरून रोहिणखेडकडे जात होता. धावती मोटारसायकल खड्ड्यात आदळल्याने मागे बसलेला कृष्णा पडला. यात त्याच्या हात पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या दोन मित्रांनी त्याला लगेच जिल्हा रुग्णालयात दाखल केले.