धक्कादायक… बुलडाणा जिल्ह्यातून सरासरी रोज एक तरुणी, महिला बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातून रोज सरासरी एक महिला, तरुणी किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या १ ते ८ ऑक्टोबरदरम्यानची आकडेवारी लक्षात घेतली तर आठच दिवसांत तब्बल १० महिला, तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यातील ७ जणी पंचविशीच्या आतील आहेत. याशिवाय ९ पुरुष बेपत्ता झाले असून, एकूण बेपत्तांचा आकडा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातून रोज सरासरी एक महिला, तरुणी किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या १ ते ८ ऑक्‍टोबरदरम्‍यानची आकडेवारी लक्षात घेतली तर आठच दिवसांत तब्‍बल १० महिला, तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. यातील ७ जणी पंचविशीच्या आतील आहेत. याशिवाय ९ पुरुष बेपत्ता झाले असून, एकूण बेपत्तांचा आकडा १९ च्‍या घरात जातो. यात अल्पवयीनांचा समावेश नाही. तो धरला तर आकडा आणखी वाढतो.

या बेपत्ता झाल्या महिला, तरुणी…
दिव्या अशोक जाणे (१९, रा. गाडेगाव बुद्रूक, ता. जळगाव जामोद, पोलीस ठाणे जळगाव जामोद), ममतादेवी बुलेटकुमार शाह (२५, रा. इसोली, ता. चिखली, पोलीस ठाणे अमडापूर), सौ. सरला समाधान थुट्टे (३०, रा. खैरव, ता. चिखली, पोलीस ठाणे चिखली), मायाबाई दीपक शिंदे (२१, रा. गोसिंग, ता. मोताळा, पोलीस ठाणे बोराखेडी), मीरा जगन्‍नाथ महाजन (१९, रा. दसरखेड, ता. मलकापूर, पोलीस ठाणे मलकापूर), अंजली शरद जाधव (१८, रा. ऑटो स्‍टॉप, वरवंड, ता. बुलडाणा, पोलीस ठाणे बुलडाणा ग्रामीण), सौ. पूजा दीपक पिंपळे व कु. खुशी (२१, मेहकर टाऊन, आंबेडकरनगर, मेहकर, पोलीस ठाणे मेहकर), सौ. प्रमिला नितीन शिंदे (३०, रा. बसस्‍थानकाजवळ नांदुरा, पोलीस ठाणे नांदुरा), सौ. हिराबाई पर्वतगीर मुळे (६०, भंडारी, ता. खामगाव, पोलीस ठाणे पिंपळगाव राजा), सौ. रुख्मिना रामेश्वर मोरे (२६) व जय रामेश्वर मोरे (५, दोघे रा. कारेगाव, ता. लोणार पोलीस ठाणे लोणार).

हे पुरुष, तरुण झाले बेपत्ता
सर्जेराव बाबुराव माने (४७, रा. सावखेड भोई ता. देऊळगाव राजा, पोलीस ठाणे देऊळगाव राजा), विवेक अशोक किनगे (२४, सांगळद, ता. मोताळा, पोलीस ठाणे बोराखेडी), अच्‍युतराव रयाजी उगले (६५, रा. धोडप, ता. चिखली, पोलीस ठाणे अमडापूर), विकी भरत चव्‍हाण (२४, रा. शेंबा, नांदुरा, पोलीस ठाणे बोराखेडी), विष्णू सुधाकर रदाळ (३३, रा. बिरसिंगपूर, ता. बुलडाणा पोलीस ठाणे बुलडाणा ग्रामीण), अभय चंद्रकांत ठाकूर (३४, रा. वावरे ले आऊट, बुलडाणा, पोलीस ठाणे बुलडाणा शहर), रवी ओमप्रकाश अग्रवाल (३८, यशोधामनगर, मलकापूर, पोलीस ठाणे मलकापूर शहर), आकाश पंढरीनाथ भालेराव (२५, महीमळ, ता. चिखली, पोलीस ठाणे अमडापूर), गणेश श्यामराव वरणकार (३०, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद पोलीस ठाणे जळगाव जामोद).