दोन दुचाकींच्‍या धडकेत १ ठार, शेगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २५ जूनला दुपारी अडीचच्या सुमारास भास्तन ते पहूरपूर्णा रोडवरील भास्तन शिवारात घडली होती. आज, ४ जुलैला या प्रकरणात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भास्कर समाधान देवचे (४६, रा. माटरगाव बुद्रूक, ता. शेगाव) यांनी तक्रार दिली, की …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींच्‍या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना २५ जूनला दुपारी अडीचच्‍या सुमारास भास्‍तन ते पहूरपूर्णा रोडवरील भास्‍तन शिवारात घडली होती. आज, ४ जुलैला या प्रकरणात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

भास्कर समाधान देवचे (४६, रा. माटरगाव बुद्रूक, ता. शेगाव) यांनी तक्रार दिली, की त्‍यांचे भाऊ सुधाकर समाधान देवचे (रा. माटरगाव) मोटारसायकलने (क्र. एमएच २८ के ७०१) कालवड येथे पहूरपूर्णा ते भास्तन रोडने जात असताना वासुदेव भांबेरे याने त्‍याच्‍या ताब्‍यातील मोटारसायकल (क्र. एमएच २८ बीएल ०९६०) भरधाव व निष्काळजीपणाने चालवून देवचे यांच्‍या मोटारसायकलला धडक दिली. यात देवचे यांचा मृत्‍यू झाला. तपास पोलीस कर्मचारी तुकाराम इंगळे करत आहेत.