दीडशे मेंढ्या चोरून घेऊन जात होते; लोकांनी बघितले अन्‌ धो धो धुतले!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीडशे मेंढ्यांचा कळप चोरून घेऊन जात असताना दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला अन् थेट पोलीस ठाण्यात नेऊन घातले. ही घटना काल, १८ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास खामगाव तालुक्यातील नायरे फाट्याजवळ घडली. हिवरखेड पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारत साहेबराव हटकर (२८, रा. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीडशे मेंढ्यांचा कळप चोरून घेऊन जात असताना दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडले. त्‍यानंतर लाथाबुक्‍क्यांचा प्रसाद दिला अन्‌ थेट पोलीस ठाण्यात नेऊन घातले. ही घटना काल, १८ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास खामगाव तालुक्यातील नायरे फाट्याजवळ घडली. हिवरखेड पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भारत साहेबराव हटकर (२८, रा. हिवरखेड ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हटकर यांच्या जावयाची मेंढरे त्यांच्या मोकळ्या वाड्यात होती. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास दशरथ इंदा खताड (३४, रा. कोंटी ता. खामगाव) व यादवराव गोदाजी (४५, रा. वदोडा कुऱ्हा जि. जळगाव) हे दोघे दीडशे मेंढ्यांचा कळप घेऊन जात होते. याची चाहूल लागताच हटकर यांनी चोरट्यांना आवाज दिला असता दोघेही मेंढ्या सोडून पळाले. हटकर यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली असता गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. लाथाबुक्‍क्यांचा प्रसाद देऊन दोन्ही चोरट्यांना हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.