तहान लागल्याने विहिरीवर गेल्या, पाणी काढताना पडून वृद्धेचा मृत्‍यू; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना वाहाळा बुद्रूक (ता. खामगाव) शिवारात २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास समोर आली. सौ. वेनुबाई बळीराम सपकाळ (६५, रा. वाहाळा बुद्रूक) या मालकीच्या शेतात काम करताना त्यांना तहान लागली. त्या शेतातील विहिरीत पिण्याचे पाणी आणण्यासाठी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्‍याने वृद्धेचा मृत्‍यू झाला. ही घटना वाहाळा बुद्रूक (ता. खामगाव) शिवारात २२ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११ च्‍या सुमारास समोर आली.

सौ. वेनुबाई बळीराम सपकाळ (६५, रा. वाहाळा बुद्रूक) या मालकीच्या शेतात काम करताना त्‍यांना तहान लागली. त्या शेतातील विहिरीत पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढताना त्यांचा पाय घसरून त्या पडल्या. बुडून त्‍यांचा मृत्‍यू झाला. घटनेवेळी शेतात वेनुबाई सपकाळ यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा काम करत होते.

भरपूर वेळ झाला तरी त्या विहीरीवरून परत न आल्याने शेतातील इतरांनी विहिरीवर जाऊन बघितले असता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. सौ. वेनुबाई यांचा मुलगा महादेव बळीराम सपकाळ यांनी घटनेची माहिती खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी एएसआय आनंदा वाघमारे यांच्‍यासह पोहेकाँ गणेश जाधव यांनी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.