ग्रामसेवक- सरपंचांत जुंपली!; साथीदाने कानाखाली मारली!!; कोऱ्हाळा बाजार ग्रामपंचायतीत धिंगाणा

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माेताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आणि सरपंचात जुंपल्याचा प्रकार काल, ३१ ऑगस्टच्या सकाळी अकराच्या सुमारास घडला. यावेळी सरपंचाच्या साथीदाराने ग्रामसेवकाच्या कानशिलात लगावली. जीवे मारण्याची धमकीही दिली. सुमारे तासभर हा धिंगाणा गावाला शिस्त लावणाऱ्या ग्रामपंचायतीत सुरू होता. या प्रकरणात ग्रामसेवक सुरेश पुंडलिक जाधव (३७) यांनी तक्रार दिली असून, त्यावरून सरपंच …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माेताळा तालुक्‍यातील कोऱ्हाळा बाजार ग्रामपंचायतीत ग्रामसेवक आणि सरपंचात जुंपल्याचा प्रकार काल, ३१ ऑगस्‍टच्‍या सकाळी अकराच्‍या सुमारास घडला. यावेळी सरपंचाच्‍या साथीदाराने ग्रामसेवकाच्‍या कानशिलात लगावली. जीवे मारण्याची धमकीही दिली. सुमारे तासभर हा धिंगाणा गावाला शिस्त लावणाऱ्या ग्रामपंचायतीत सुरू होता.

या प्रकरणात ग्रामसेवक सुरेश पुंडलिक जाधव (३७) यांनी तक्रार दिली असून, त्‍यावरून सरपंच श्रीकृष्ण सुपडा सोनोने (५८), गजानन सुगदेव गोराडे (४८, दोघे रा. कोऱ्हाळा बाजार) यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत ग्रामसेवक जाधव यांनी म्‍हटले आहे, की मासिक सभा असल्याने ते ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. विवाह झालेल्यांची नोंद रजिस्‍टरला घेऊन सरपंच सोनोने यांनी आवश्यक कागदपत्र नसतानाही विवाह प्रमाणपत्रासाठी माझ्यासमोर ठेवले व आताच्या आता मला सही करून दे, असे धमकावले. तू सही करत नसशील तर मी तुला ग्रामपंचायतीचे कोणतेही काम करू देणार नाही.

मी माझ्या सहीने प्रमाणपत्र देतो. माझे कोण काय वाकडं करतो ते मी पाहतो, असे म्हणून शिविगाळ करून सरपंचांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तू आताच्या आता सही करून प्रमाणपत्र देऊन टाक. नाहीतर तुला येथून जाऊ देत नाही. तू येथून कसा जातो तेच पाहतो, असेही सरपंचांनी धमकावल्याचे ग्रामसेवकाने म्‍हटले आहे. कागदपत्रे तपासत असताना सरपंचांचा साथीदार गोराडे याने गालावर चापट मारली व शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला व ग्रामपंचायतीत आम्ही तुला कामकाज करू देणार नाही. तुला सदर प्रमाणपत्रावर सही केल्याशिवाय येथून जाऊ देणार नाही, असे धमकावल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोहेकाँ सुरेश सोनवणे करत आहेत.