कुलरचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्‍यू; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातील कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरून विवाहित तरुणीला शॉक बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. नांदुरा तालुक्यातील धाडी येथे ही घटना १७ जुलैला पहाटे सहाच्या सुमारास घडली. सौ. सपना संदीप बाठे (२४, रा. धाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सपना घरातील कुलर जवळ पडलेली दिसल्याने तिच्या पतीने …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातील कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरून विवाहित तरुणीला शॉक बसला. यात तिचा जागीच मृत्‍यू झाला. नांदुरा तालुक्यातील धाडी येथे ही घटना १७ जुलैला पहाटे सहाच्‍या सुमारास घडली.

सौ. सपना संदीप बाठे (२४, रा. धाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सपना घरातील कुलर जवळ पडलेली दिसल्याने तिच्या पतीने आरडाओरडा केल्यामुळे मी गेलो असता महिला पडलेली होती. आम्ही महिलेला ताबडतोब नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता उपस्थित डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती अनंता बाठे (रा. धाडी) यांनी नांदुरा पोलीस ठाण्याला दिली. त्‍यावरून पोलिसांनी घटनास्‍थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.