उबाळखेडच्‍या ऑटोथांब्‍यावरून अल्पवयीन मुलीचे अपहरण!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उबाळखेड (ता. मोताळा) येथील ऑटोथांब्यावरून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. रोहिणखेड येथे शिलाईला टाकलेले कपड आणण्यासाठी निघाली होती. तिला बेपत्ता करण्यात गावातील तिघांचा हात असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दिली आहे. आकाश शेषराव येमणेरे, लहु साहेबराव शिकारे, गौरव देविदास भिसे (सर्व रा. उबाळखेड) अशी संशयितांची …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उबाळखेड (ता. मोताळा) येथील ऑटोथांब्‍यावरून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. रोहिणखेड येथे शिलाईला टाकलेले कपड आणण्यासाठी निघाली होती. तिला बेपत्ता करण्यात गावातील तिघांचा हात असल्याची तक्रार मुलीच्‍या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दिली आहे.

आकाश शेषराव येमणेरे, लहु साहेबराव शिकारे, गौरव देविदास भिसे (सर्व रा. उबाळखेड) अशी संशयितांची नावे आहेत. १७ वर्षीय मुलगी तिच्‍या आईला सांगून रोहिणखेड येथे शिलाईसाठी टाकलेले कपडे आणण्यास निघाली होती. उबाळखेडच्‍या ऑटोथांब्यावरून तिला आकाशने लहु आणि गौरवच्या मदतीने पळवले. तिला मोटार सायकलवर बसवून फूस लावून कोठेतरी नेण्यात आले. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्‍या वडिलांनी तिचा शोध सुरू केला असता रात्री आठला गावातील एका व्‍यक्‍तीने त्‍यांना मुलीचे तिघांनी अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी आकाश, लहु, गौरव या तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक अशिष गंद्रे करत आहेत.