उजव्या हातावर देवीचे चित्र गोंदलेला मृतदेह आढळला!; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव रोडवरील सुंदरखेड परिसरातील चेतनानगर पाटीजवळ अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज, २४ सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास आढळला. बुलडाणा शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. त्याच्या उजव्या हातावर देवीचे चित्र गोंदलेले आहे. उजव्या हाताला सलाईनची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव रोडवरील सुंदरखेड परिसरातील चेतनानगर पाटीजवळ अंदाजे ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज, २४ सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास आढळला. बुलडाणा शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. त्‍याच्‍या उजव्या हातावर देवीचे चित्र गोंदलेले आहे. उजव्या हाताला सलाईनची सुई सुद्धा लावलेली आहे. त्याच्‍यावर कुठेतरी उपचार सुरू असावेत असा कयास आहे.