असाही प्रामाणिकपणा… चपला-बूट शिवणाऱ्या वसंत शेळकेंनी बॅगमध्ये सापडलेले ४४ हजार रुपये केले परत!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील भोंडे सरकार चौकात त्यांचा चपला-बूट शिवण्याचा व्यवसाय… दिवसाला २००-३०० रुपयांची कमाई… दसऱ्याच्या दिवशी सर्क्युलर रोडवरील पुर्वा मुकेश जैस्वाल यांनी त्यांच्या घरातील ७-८ बॅगा शिवण्यासाठी त्यांच्याकडे आणून दिल्या व त्या निघून गेल्या. घरी गेल्यानंतर पैसे हरवले असल्याचे त्यांना वाटले. घरात शोधाशोध करूनही त्यांना पैसे सापडले नाहीत. इकडे बॅगा शिवण्याचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील भोंडे सरकार चौकात त्यांचा चपला-बूट शिवण्याचा व्यवसाय… दिवसाला २००-३०० रुपयांची कमाई… दसऱ्याच्या दिवशी सर्क्युलर रोडवरील पुर्वा मुकेश जैस्वाल यांनी त्यांच्या घरातील ७-८ बॅगा शिवण्यासाठी त्यांच्याकडे आणून दिल्या व त्या निघून गेल्या. घरी गेल्यानंतर पैसे हरवले असल्याचे त्यांना वाटले. घरात शोधाशोध करूनही त्यांना पैसे सापडले नाहीत. इकडे बॅगा शिवण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॅगमध्ये ४४ हजार रुपये शेळकेंना मिळून आले. मात्र त्यांच्याकडे पुर्वा जैस्वाल यांचा मोबाइल नंबर नव्हता. त्यांनी तातडीने ती रक्कम बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणून दिली. दुसऱ्या दिवशी बॅग घेण्यासाठी आलेल्या पुर्वा जैस्वाल त्यांना जेव्हा रकमेबद्दल कळाले तेव्हा त्यांना हायसे वाटले. आज, १७ ऑक्टोबर रोजी ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी पुर्वा जैस्वाल यांना ४४ हजार रुपये परत केले. यावेळी जैस्वाल यांनी शेळकेंच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांना २ हजार रुपयांचे बक्षीसही जैस्वाल यांनी दिले.