अट्टल घरफोड्याच्‍या घरातूनच आवळल्‍या मुसक्‍या; दुसरबीडमध्ये एलसीबीची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरी आणि घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला काल, 4 मे रोजी यश आले. ही कारवाई दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथे करण्यात आली. सतीश ऊर्फ सचिन बबन पवार (रा.दुसरबीड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो राजरोस गुन्हे करून फरारी होत होता. त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चोरी आणि घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्‍हेगाराच्‍या मुसक्‍या आवळण्यात बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेला काल, 4 मे रोजी यश आले. ही कारवाई दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथे करण्यात आली.

सतीश ऊर्फ सचिन बबन पवार (रा.दुसरबीड) असे या गुन्‍हेगाराचे नाव आहे. तो राजरोस गुन्हे करून फरारी होत होता. त्‍याच्‍या घरातून त्‍याला ताब्‍यात घेण्यात आले. त्‍याला पुढील कारवाईसाठी अंढेरा पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक  अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, हेकाँ. विलास काकड, पो.ना. गजानन आहेर, पो.काँ. विजय सोनुने, पो.काँ. गजानन गोरले, चालक राहुल बोर्डे यांनी केली.