BREAKING एसपी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न! अंगावर डिझेल घेतले; पोलिसाच्या त्रासाला कंटाळून.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. आज १८ सप्टेंबर रोजी १२: १५ वाजेच्या सुमाराची घटना घडली. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील राहणार आहे. वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार बिलाल शाह मोहसीन शहा असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी व खंडणीची मागणी हेड कॉन्स्टेबल सतीश मुळे यांनी दिल्याची तक्रार बिलाल शाह या तरुणाने केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने तरुणाने आज टोकाचे पाऊल उचलले..