जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर दगडाने मारहाण; तरुण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश धनंजय इंगळे (वय २९, रा. कुन्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली.
याबाबत दुर्गा सुरेश शिंदे (वय ४०, रा. अग्रसेन भवनजवळ, शेगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता त्यांचा मुलगा गणेश सुरेश शिंदे याला आरोपी निलेश इंगळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली.
यानंतर वाद वाढताच आरोपीने हातातील दगडाने गणेशच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या भागात मारून त्याला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर जखमी गणेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तोंडी तक्रारीवरून तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव शहर पोलिसांनी अप क्रमांक ६१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत असून, घटनेमागील नेमका वाद आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.