पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची सासुरवाडीतच आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..!
Sep 10, 2025, 09:36 IST
जळगाव खांदेश जिल्ह्यातील कुंभारी (ता. जामनेर) येथील इंदुबाई चिंधु मुके यांनी धामणगाव बढे पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाचा बादल मंडाळे याला ८ सप्टेंबर रोजी पत्नी रुपाली बादल मंडाळे हिने पोटातील बाळ पाडल्याचे समजले. त्यानंतर तो पत्नी रुपालीला घेऊन जाण्यासाठी मोताळा तालुक्यातील लपाली येथे गेला होता.
दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादीच्या पुतण्याने, श्रीराम जोशी याने फोनवर माहिती दिली की बादल मंडाळे याने विषारी औषध प्राशन करून लपाली येथे आत्महत्या केली. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांनी लपाली येथे पोहोचून पाहिले असता बादल मंडाळे हा गावातील बंडू होसा एकणार यांच्या घरी मृत अवस्थेत आढळला.
गावातील चौकशीत स्थानिक गोपाल दगडू मुंडाळे यांनी सांगितले की, बादल मंडाळे याचा पत्नी, सासू-सासरे व साल्यासोबत वाद झाला होता. या वादानंतरच त्याने आत्महत्या केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी मृतकाची पत्नी रुपाली बादल मंडाळे, सासरे संजय जयराम भंवर, सासू लिलाबाई संजय भंवर व साला अक्षय संजय भंवर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत