नापीकिला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या! विष पिऊन स्वतःला संपवले; अंढेरा येथील घटना
May 25, 2024, 08:45 IST
अंढेरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. विष पिऊन युवा शेतकऱ्याने स्वतःला संपवले. देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे ही घटना घडली. ज्ञानेश्वर ओंकार तेजनकर (३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ज्ञानेश्वर यांनी २० मे रोजी स्वतःच्या शेतात विषप्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना अत्यवस्थ अवस्थेत बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २३ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर यांनी सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, पत्नी,१ मुलगा ,१ मुलगी, बहीण, भाऊ असा परिवार आहे.