म्हणे तू काही काही कामाची नाही! आमच्या घरात राहू नको! होमगार्ड तरुणीचा नवऱ्याकडून हुंड्यासाठी छळ! दागिने काढून घराबाहेर काढले.. बुलढाण्याच्या तुळसीनगरातील घटना...
याबाबत तक्रारदार विवाहिता गायत्री आकाश उफाड (वय २६) होमगार्ड, रा. अजिसपुर रोड, तुळशीनगर, बुलढाणा ह.मु. मोताळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला माहेरवरून काही हुंडा दिला नाही. तुझ्या खर्चासाठी तुझ्या आईकडून पैसे आणत जा, अशी वारंवार मागणी केली. तुला काही
कामधंदा येत नाही. तू काही कामाची नाही. तू आमच्या घरात राहायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून दागिने काढून घेतले आणि घरातून हाकलून दिले. परत या घरात यायचे नाही, अशी धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केला. अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून तसेच महिला व मुलांकरीता सहाय कक्ष पोलीस स्टेशन बुलढाणा यांचे पत्रावरुन बोराखेडी पोलिसांनी फिर्यादीचा पती आकाश दत्ता उफाड, जेठ सुरज दत्ता उफाड, जेठाणी आरती सुरज उफाड तिन्ही रा. तुळशीनगर बुलढाणा यांच्याविरुध्द कलम ८५११५ (२), ३५२, ३५१ (२), बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाँ. अशोक अडोकार हे करीत आहेत.
हुंड्यासाठी वारंवार पैशांची मागणी करून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करीत दागिने काढून घेत घरातून हाकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी सासरच्या ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत फिर्यादी गायत्री आकाश उफाड (वय २६) होमगार्ड, रा. अजिसपुर रोड, तुळशीनगर, बुलढाणा ह.मु. मोताळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला माहेरवरून काही हुंडा दिला नाही. तुझ्या खर्चासाठी तुझ्या आईकडून पैसे आणत जा, अशी वारंवार मागणी केली. तुला काही