मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने वार; आरोपीनेही स्वतःवर केला हल्ला...

 
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोशनी रविंद्र साळी (वय १९, रा. गोकुळधाम नगर, मलकापूर) हिची बहीण जखमी जानवी रविंद्र साळी आणि आरोपी शुभम विलास झनके (वय अंदाजे २९, रा. मधुवन नगर, मलकापूर) हे दोघे मित्र होते. दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, फिर्यादीचे कुटुंब घरी असताना शुभम हा त्यांच्या घरी आला. त्याने जानवीकडे मोबाईल फोन मागितला. मात्र तिने मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या शुभमने रागाच्या भरात चाकूने जानवीच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले.
यानंतर, स्वतःच्या कृत्याचा परिणाम पाहून घाबरलेल्या शुभमने तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला.
घटनेनंतर तातडीने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी रोशनी रविंद्र साळी हिने तक्रार दिल्यानंतर आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौळासे करीत आहेत.