लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; शेगावच्या लॉजवर घडले पाप..!
Jul 26, 2025, 10:43 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना ११ जून रोजी शेगांव शहरातील एका गेस्ट हाऊसवर घडली. या प्रकरणी २४ जुलै रोजी पिंपळगांव काळे येथील राजू भोनाजी अवचार या युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राजु भोनाजी अवचार याने लग्नाचे आमिष दाखवून शेगावात गेस्ट हाऊस येथे नेऊन 'मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्यासोबत लग्न करणार आहे' असे म्हणून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जळगांव जामोद येथून सदरचा गुन्हा पोस्टे शेगाव शहर येथे ऑनलाइन वर्ग करण्यात आला. यातील फिर्यादी यांचेसोबत नमुद आरोपी यांनी ओळख करुन लग्राचे आमीष देवून नमूद घतावेळी व ठिकाणी आरोपी यांनी फियादीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. अशा जळगांव जामोद येथे दिलेल्या तरुणीच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अलग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; शेगावच्या लॉजवर घडले पाप..!प नं ४३४/२५ कलम ६९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.