तरुणीची छेड काढून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  तालुक्यातील एका गावात तरुणीची छेड काढून तिला शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा  प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणी पिडीत युवतीने भावाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास   ही घटना घडली
फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून, आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीचा हात पकडून वाईट उद्देशाने तिची छेडछाड केली. तसेच अश्लील व अपमानास्पद शिवीगाळ करत तिला व फिर्यादीस चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपींनी जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याने फिर्यादीच्या बहिणीच्या सुरक्षिततेचा व जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गणेश संजय खंदारे, संजय प्रल्हाद खंदारे, गजानन प्रल्हाद खंदारे व अर्जुन तोताराम गायकवाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्ग द र्शनात   हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत .