भरधाव ऑटाे उलटला, महिला जागीच ठार; निमगाव ते नांदुरा रस्त्यावरील घटना..! 

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव ऑटाे उलटल्याने ५७ वर्षीय महिला जागीच ठार झाली तर इतर प्रवाशी जखमी झाले. ही घटना १५ सप्टेंबर राेजी नामगाव ते निमगाव ते नांदुरा रस्त्यावर घडली. बेबाबाई शिवदास चांभारे रा.पलसाेडा असे मृतक महिलेचे नाव आहे. 
नांदुरा तालुक्यातील निमगाव येथून ऑटो क्रंएम. एच. -२८-सी-९९८९ ने शालेय विद्यार्थ्यासह महिला व पूरूष प्रवाशी प्रवास करीत हाेते. दरम्यान, हाॅटेल संगम समाेर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ऑटाे उलटला. यामध्ये बेबाबाई चांभारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ऑटाेतील इतर प्रवाशी जखमी झाले.  
अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, पोहेकॉ भिमराव वानखेडे यांच्यासह ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, कृष्णा वसोकार, विकी भोलणकर यांनी
रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
या अपघात प्रकरणी नांदुरा पोलिसांनी ऑटाेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ सैय्यद हे करीत आहेत.