पत्नी जवळ राहत नसल्याने नेहमी राहत होता उदास!; राहत्‍या घरात घेतला युवकाने गळफास!!; नांदुरा तालुक्यातील घटना

 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३४ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, २८ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाड येथे घडली. सदानंद प्रल्हाद दांडगे (रा. हिंगणे गव्हाड, ता. नांदुरा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

सदानंदची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत असल्याने तो नेहमी उदास राहत होता. आज दुपारी ३ च्या सुमारास राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.