"पोराचा मोबाईल का फेकला" ? विचारायला गेल्या अन्... माळविहीरमध्ये महिलेसोबत चुकीचे घडले! 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुलाचा मोबाईल का फेकला? असे विचारायला गेलेल्या ३२ वर्षीय महिलेसोबत चुकीची घटना घडली. ३ जुलैच्या सायंकाळी माळविहीर मध्ये ही घटना घडली आहे. प्रकरणी एका जणाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
नेमके प्रकरण असे की, शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळविहीर गावात बुधवारी राडा झाला. गावातील ३२ वर्षीय मीरा शंकर बरडे यांनी घटनेची तक्रार दिली. मीरा बरडे ह्या शेती काम करतात. बुधवारी, संध्याकाळी ७ वाजता घरी असताना त्यांचा मुलगा गणेश घरी आला. यावेळी गावातील नंदू निकम याने माझा मोबाईल खाली फेकून दिल्याचे गणेशने आईला सांगितले. यानंतर मिरा बरडे यांनी घरासमोर येऊन नंदू निकम याला जाब विचारला. "तू माझ्या मुलाचा फोन का फेकला ? असे विचारले असता नंदू निकम म्हणाला की, तुझ्याकडून काय होते ते करून घे. यानंतर, अश्लील शिवीगाळ केली.
यादरम्यान, मिरा बरडे यांचे पती शंकर बरडे हे त्याची समजूत काढण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना देखील नंदू निकमने चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर, तुम्हा दोघांना जीवाने मारून टाकतो अशी धमकीही त्यांनी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी नंदू निकम विरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष मस्के करीत आहेत.