चिखलीत कोण आहे गुटखा किंग? 'स्विफ्ट' मधून करत होता गुटख्याची वाहतूक; एलसीबीने देऊळघाट मध्ये पकडला; पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त....
Jun 7, 2026, 17:56 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार मधून गुटख्याची वाहतूक चिखलीतील सैलानी नगर येथील इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख सलीम शेख इस्माईल असे आरोपीचे नाव आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH -28-ET-5300 या कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देऊळघाट येथे सदर गाडीला पकडून वाहतूक करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा किंमत ३,२८,९०० रुपये आणि मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर २,५०,००० असा एकूण ५ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यांनी पार पाडली कार्यवाही
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. दिलीप लेकुरवाळे, विजय वारूळे, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे, पोकॉ. अमोल वनारे यांनी पार पाडली