असा कसा नेता! शिंदे गटाचा तालुकाप्रमुख जुगारी! खामगावात तालुकाप्रमुखांच्या जुगार अड्ड्यावर डीवायएसपी पथकाची धाड.. अंधारात पळून गेला तालुकाप्रमुख; पण ६ जणांना साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह पकडले.....
शेलोडी शिवारातील शेतात 'एक्का बादशहा'चा अड्डा चालू होता. पोलिसांनी या अड्ड्यातून ८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेलोडी शिवारातील एका शेतातील टीनशेडमध्ये 'एक्का बादशहा'चा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत १२ जणांना अटक करत त्यांच्याकडून ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
७ ऑगस्ट रोजी पहाटे १.४५ च्या सुमारास खामगाव तालुक्यातील शेलोडी शिवारात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे नियोजन करून त्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याच्या तयारीत होते.
संजय देवमन शेगोकार (52, रा. कवठा, ता. बाळापूर), सुनील राजेंद्र भोजने (19), शुभम दिलीप भोजने (26), अमोल रमेश मुंडाले (27), निवृत्ती भगवान हिंगणे (34) - सर्व रा. तिंत्रव, ता. शेगाव, सचिन मधुकर मोहाडे (30), प्रभाकर सुखदेव तायडे (46), नंदकिशोर प्रल्हाद आरे (51), विनोद जनार्धन जाधव (48) - सर्व रा. शेलोडी, ता. खामगाव, नासिर खाँ बशीर खाँ (40, रा. शिवपुरा जामोद, ता. जळगाव जामोद), आकाश वसंता हांडे (30, रा. लोनखेल जामोद, ता. जळगाव जामोद), शेख राजीक शेख शफीक (45, रा. आवार, ता. खामगाव) या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण ८,४३,८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या अड्ड्याचा मुख्य सूत्रधार राजू बघे, रा. पिंप्री गवळी हा पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं किरण राऊत करीत आहेत.