मित्राच्या घरी झोपायला गेला अन् मित्रानेच घात केला..! आई वडील नसलेल्या २४ वर्षीय करण सोबत चुकीचं घडलं.! संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील घटना
Jun 6, 2026, 08:21 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बिचारा करण नांदेड जिल्ह्यातल्या सखोजे नगर येथील राहणारा...त्याला आई वडील नाहीत..नातेवाईकही जवळ करत नाही..शेवटी त्याने दोस्तावर विश्वास ठेवला.. दोस्तानेही त्याला काम लावून दिले..मात्र दोस्ताच्या घरी झोपायला आल्यावर मात्र त्याच्यासोबत अनपेक्षित घडलं..आता हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहचलं आहे.
करण अशोक सुलेवाड याने या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार त्याला आई-वडील नाहीत.. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील सोपान भिवटे हा त्याचा मित्र.. सोपाननेच त्याला काम लाऊन दिले.. करणची तब्येत बरी नसल्याने तो २८ मे पासून सोपानच्याच घरी झोपायला राहत होता.दरम्यान एके दिवशी सोपानला करणने सांगितले की तो कामासाठी जात आहे. त्यावेळी सोपानने त्याला ५०० रुपये मागितले..मात्र करण कडे पैसे नसल्याचे करण ने सांगितले.
करणच्या या उत्तराने सोपान संतापला. त्याने करणला चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली.. त्यानंतर सोपान ने कुऱ्हाडीच्या दांड्यानेही डोक्यात मारहाण केली. डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्याने करण खाली पडला. सोपान सोबत असलेल्या केशव नावाच्या व्यक्तीने करण ला पकडून ठेवले, त्यावेळी सोपानने कुऱ्हाडीच्या दांड्याने करण च्या पायावर मारहाण केली.. सोपान जमिनीवर पडलेला होता.. त्याचवेळी तिथे पोलिसांची गाडी आली.. पोलिसांची गाडी पाहून सोपान आणि केशव तिथून पसार झाले . पोलिसांनी करणला वैद्यकीय उपचारासाठी भरती केले, त्यानंतर त्याच्या बयानावरून सोपान आणि केशव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.