दुर्दैवी!विहीगाव - अटाळी रस्त्यावर भीषण अपघात!दोन दुचाक्या एकमेकांवर आदळल्या..दोघे ठार..
Dec 3, 2025, 10:39 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विहीगाव - अटाळी रोडवर दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे.
पवन राजू बावस्कार (१७) रा.अटाळी हा आपल्या दुचाकीने खामगाव वरून मित्रांसोबत अटाळी येथे येत होते.उमेश लोखंडकार (३७) रा.नागापूर हे आपल्या दुचाकीने अटाळी वरून नागापूर येथे जात होते.संध्याकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दोघांच्याही दुचाकींचे नियंत्रण सुटून दोन्ही दुचाकी फाळके यांच्या शेताजवळ एकमेकांवर आदळल्या अपघात एवढा भीषण होता दोन्ही दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून पवन राजू बावस्कार,उमेश लोखंडकार दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी दोघांनाही ॲम्बुलन्स बोलवून खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले आहे.