दुर्दैवी..! गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीचे वाहन पलटी; एक जण ठार,५ जखमी! अमडापूरजवळ झाला अपघात...
Sep 18, 2024, 08:29 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीचे वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना काल,१७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेचा सुमारास अमडापूर जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार अकोला येथील भारत भारत बँड पार्टीचे चिखली येथे विसर्जन मिरवणुकीसाठी जात होती. अमडापूर चिखली रस्त्यावर ४०७ वाहनाचे टायर फुटल्याने वाहन पलटी झाले. यामुळे डोक्याला मार लागल्याने एका वादकाचा मृत्यू झाला तर ७ ते ८ जण जखमी झाले.