मालवाहू वाहनाच्या चाकाखाली सापडून दुचाकी चक्काचूर सागवन येथील घटना; दुचाकीस्वार बचावले... 

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माल वाहतूक करणाऱ्या टाटा ४०७ वाहनाच्या समोरील चक्क्याखाली सापडून दुचाकीचा चेंदामेंदा झाल्याची घटना १० एप्रिलच्या रात्री ९.४५ वाजता तालुक्यातील सागवन जवळ घडली. या अपघातात कोणतीही जिवितहाणी झाली नसून दोन्ही दुचाकीस्वार सुदैवाने बालंबाल बचावले.
दोन अल्पवयीन मुले दुधा येथून बुलढाणाकडे येत होते. सागवन (ता. बुलढाणा) नजीक सदर दुचाकी व टाटा वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली. नव्हेतर दुचाकीवर स्वार असलेले दोन्ही मुले बाजूला फेकल्या जाऊन सदर दुचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या समोरील चाकाखाली जाऊन चेंदामेंदा झाले. दुचाकीस्वार जोरात बाजूला फेकल्या गेल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, दोघेही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी अपघातग्रस्तांना उचलून बुलढाणा
माल वाहतूक करणारे टाटा ४०७ वाहन १० एप्रिलच्या रात्री ९.४५ वाजता दरम्यान बुलढाणाकडून दुधा गावाकडे जात होते. तर एकाच दुचाकीवर स्वार असलेले दोन अल्पवयीन मुले दुधा येथून बुलढाणाकडे येत होते. सागवन (ता. बुलढाणा) नजीक सदर दुचाकी व टाटा वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली. नव्हेतर दुचाकीवर स्वार असलेले दोन्ही मुले बाजूला फेकल्या जाऊन सदर दुचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या समोरील चाकाखाली जाऊन चेंदामेंदा झाले. दुचाकीस्वार जोरात बाजूला फेकल्या गेल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, दोघेही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी अपघातग्रस्तांना उचलून बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले.