शेतातील साहित्य लंपास करणारे दोन चोरटे गजाआड;
स्थानीय गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ! तब्बल ६.९० लाखांचा मुद्देमाल जप्त...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातील शेतमाल आणि औजारे लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले.या चोरट्यांकडून पथकाने सहा लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
ही कारवाई पो.स्टे. अंढेरा हद्दीतील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान करण्यात आली असून, यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली व रोटावेटर असा शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माल जप्त करण्यात आला आहे.


दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सरंबा (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकरी पवण शिवदास चेके यांच्या शेतातून शेंदऱ्या रंगाची ट्रॉली (किंमत ₹७५,०००/-) चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे अंढेरा येथे गुन्हा क्र. २८१/२०२५ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे नोंदविण्यात आला होता.
तसेच दि. १३ जून २०२५ रोजी त्याच गावातील विकास संपत चेके यांच्या गोठ्यातून ₹६५,०००/- किमतीचा रोटावेटर चोरीस गेला होता. या गुन्ह्याची नोंद गु.क्र. १७०/२०२५ या क्रमांकाने करण्यात आली होती.
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन्ही प्रकरणांची उकल केली.
याप्रकरणी पोलिसांनी 
गणेश आत्माराम वायाळ (वय ३८ वर्षे, रा. सावरखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना)
व अमोल सुरेश शेवत्रे (वय ३३ वर्षे, रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांना अटक केली आहे. चोरट्यांना अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.
चोरट्यांकडून ट्रॅक्टर – ₹५,५०,०००,ट्रॉली – ₹७५,०००,रोटावेटर – ₹६५,०००असा ६ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा  अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोनि. सुनिल अंबुलकर (स्थागुशा प्रमुख) यांच्या नेतृत्वाखालील पथकातील ए.एस.आय. ओमप्रकाश सावळे,पोहेकॉ. दिगंबर कपाटे,मपोहेकॉ. वनिता शिंगणे,पोकॉ. दिपक वायाळ,मनोज खरडे (स्थानिक गुन्हे शाखा),तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोकॉ. कैलास ठोंबरे यांनी सहभाग घेतला.