रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्ह्यात दोन आत्महत्या! बायकोच्या विरहात नवऱ्यानेही घेतला टोकाचा निर्णय! दुसरीकडे १ वर्षाच्या चिमुकल्याला सोडून विवाहितेने घेतला गळफास
बुलडाणा जिल्ह्यात काल रक्षाबंधनाच्या दिवशी दोन आत्महत्या घडल्या. बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथे विवाहितने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे विवाहितेचे लग्न दोन वर्ष आधी झालेली होते, विवाहितेला १ वर्षाचा निरागस चिमुकला आहे. दुसरीकडे मेहकर तालुक्यातील अंजनी बु येथे तरुण शेतकऱ्याने विषारी औषध करून आत्महत्या केली. पत्नीच्या विरहातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या घटनेने दोन चिमुकल्यांचे आई वडिलांचे छत्र हरवले आहे..
मेहकर/बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,१९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्ह्यात दोन आत्महत्यांच्या घटना घडली. एक घटना रायपूर(ता.बुलडाणा) तर दुसरी अंजनी बु (ता.मेहकर) येथे घडली. रायपूर येथे विवाहिता महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली तर अंजनी बु येथे शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
रायपूर येथे वंदना मुकेश सिरसाठ या विवाहित महिलेने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी महिलेचा विवाह झाला होता, तिला एक वर्षाचा मुलगा आहे. घटनेच्या वेळी महिला एकटीच घरी होती. रायपूर पोलीस पुढील तपास करत आहेत...
बायकोच्या विरहात नवऱ्याची आत्महत्या ..
मेहकर तालुक्यातील अंजनी बु गावात काल रक्षाबंधनाच्या दिवशी मनाला हेलावून सोडणारी घटना घडली. विनोद बबन काकडे(३७) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या दीड महिन्याआधीच पोटातील गोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अर्चना बबन काकडे (३०) यांचा मृत्यू झाला होता. अर्ध्यावरती संसाराचा डाव मोडल्याने पत्नीच्या मृत्यूच्या दुःखात ते होते. त्या दुःखातच त्यांनीदेखील जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे रूद्र(१०) आणि आरूष(५) या चिमुकल्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.