रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...
Apr 9, 2026, 15:00 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या तामगाव पोलीस स्टेशन येथील २ पोलिसांवर हल्ला केल्याची घटना ५ एप्रिल रोजी रात्री कवठळ रस्त्यावर घडली. हल्ला करणाऱ्या दोघांपैकी १ जण कवठळ येथील येथील रहिवासी पण सध्या उरळ पोलीस स्टेशन (जिल्हा अकोला) मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तामगाव पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंगचे वाहन घेऊन पोहेकॉ . संतोष तुळशीराम आखरे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद मुळे हे गस्तीवर असताना त्यांना कवठळ शिवारात गुप्तधन शोधणारी टोळी आल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून मिळाली असता ते कवठळ शिवारात गेले. पण तेथे कोणीच आढळले नाही.परत येत असताना कवठळ रस्त्यात आरोपी राजेश गव्हाळे वय ४२ व मनोज गव्हाळे वय ३८ ( पोलिस अंमलदार पो स्टे . उरळ) यांनी गस्तीवर ड्युटी करत असलेल्या पोलिसांना रस्त्यात अडवून त्यांचेशी नाहक हुज्जत घातली व अश्लील शिवीगाळ करून हातातील स्टीलचे कड्याने कपाळावर मारहाण करून त्या दोन पोलिसांना गंभीर जखमी केले.या प्रकरणी तामगाव पोलीस पोहेकाँ. संतोष आखरे यांनी फिर्याद दिल्यावरून वरील दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.