बुलडाण्यात दोन गटांत धार्मिक कारणावरून राडा! गणपती विसर्जन मिरवणुकीतनंतर मध्यरात्री साडेबाराची घटना! परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल.
शहरातील इकबाल नगर परिसरातील रहिवासी असलेला आतिक ऊर्फ शाहेबाज खान हाफिज खान (वय २३) हा त्याचा मित्र साहिल खान आणि रिहान खान यांच्यासोबत उपरोक्त ठिकाणी चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी बसलेले होते. त्यावेळी दुसऱ्या गटातील (आरोपी) युवकांचा त्यांच्यासोबत शाब्दिक वादंग सुरू झाला. त्यानंतर वादाला प्रकोप रूप मिळाले. या वादातून हाणामारी होऊन दोन्ही गटातील काही जन जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून अंदाजे १५ ते २० जणांविरुद्ध भांदवी कलम १४३,१४७,१४८,१४९,१५३,(अ),३२४,३२३,५०६, यासह मपोकाचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.