मादणीत गाेठ्याला आग, दाेन गायींचा हाेरपळल्याने मृत्यू; शेतीचे साहित्यही जळाले; तीन शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान..!

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथून जवळच असलेल्या मादणी येथे गाेठ्याला आग लागून दाेन गायींवा हाेरपळून मृत्यू झाला तर शेतीचे साहित्य जळाल्याने तीन शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ५ ऑगस्ट राेजी रात्री घडली. 
मादणी येथील गजानन बाजीराव बाजड यांच्या मालकीच्या टिनपत्राच्या गोठ्याला पाच ऑगस्ट राेजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. आग लागल्यानंतर गोठ्यात असलेल्या दोन गाई जागीच मृत्युमुखी पडल्या. मृत गायींपैकी एक अंदाजे पाच वर्षांची, तब्येतीत तांबड्या रंगाची होती आणि दुसरी तीन वर्षांची, लाल व पांढऱ्या रंगाची होती. 
दोन्हीही गिर जातीच्या गायी असून त्यांची बाजारमूल्य अंदाजे ₹६०,००० इतकी आहे.या आगीत गजानन बाजीराव बाजड यांचे ९० स्प्रिंकलर पाईप व ५०० लिटरची पाण्याची टाकी – अंदाजे ₹९५,०००, ज्ञानबा जिजेबा बाजड यांचे ३० स्प्रिंकलर पाईप किंमत अंदाजे ₹३०,०००, डिंगाबर जिजेबा बाजड यांचे ३० स्प्रिंकलर पाईप – अंदाजे ₹३०,००० जळून खाक झाले. तसेच एक जखमी झाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तलाठी अनुप नरोटे यांनी घटनास्थळी त्वरीत भेट देत पंचनामा करून अहवाल तयार केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी हाेत आहे.