दुचाकीवरून दारुची अवैध वाहतुक, पाेलिसांनी दाेघांना केली अटक; देऊळगाव राजा येथून चिखली कडे नेत हाेत दारु..!
Aug 25, 2025, 21:14 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :दारुची दुचाकीने वाहतुक करणाऱ्या दाेघांना देऊळगाव राजा पाेलिसांनी २५ ऑगस्ट राेजी अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह २८ हजार ६४० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला.
देऊळगाव राजा शहरातून काही जण दुचाकीने रोडने देशी दारू अवैध रित्या नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी काळया रंगाच्या बिना नंबरची मोटारसायकलची पोलिसांनी तपासणी केली असता पोतडी मध्ये देशी दारूच्या ९६ नग किंमत ८ हजार ६४० रुपये व मोटार सायकल किंमत २० हजार रुपये असा एकूण २८ हजसा ६४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मोटारसायकल स्वार आरोपी देविदास फकिरबा निकम रा जवळखेड, व राजकुमार सुभाष मान्टे रा.देऊळगाव राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे .