भरधाव मालवाहू वाहनाची मिनी ट्रॅक्टरला धडक; चालक ठार,
राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव शिवारातील घटना...

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :भरधाव वाहतूक वाहनाने मिनी ट्रॅक्टरला मागून जोराची धडक दिल्याने चालक ठार झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नायगाव शिवारात १६ ऑक्टोबरला सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली.योगेश विठोबा चरखे (रा.नायगाव, वय ४१) असे मृतकाचे नाव आहे.
तालुक्यातील नायगावचे रहिवासी योगेश विठोबा चरखे हे एमएच- २८-सीसी-०३३४ क्रमांकाचे मिनी ट्रॅक्टर घेऊन मलकापूरकडे जात होते. यावेळी एमएच-५०-७४३२ क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या 
ट्रॅक्टर चालक योगेश चरखे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मृताचा भाऊ मंगेश चरखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पिकअप चालक शेख साजिद शेख हरून (रा. मुक्ताईनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर वाहन सोडून फरार झालेल्या चालकास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोहेकॉ चिखलकर करीत आहेत.