टिप्परला स्कुटीची धडक! तरुणाचा जागीच मृत्यू; वाघजाळ फाट्यावर झाला अपघात...

 
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला स्कुटीची धडक झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. काल,१५ जूनच्या सायंकाळी मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यावर हा अपघात झाला. दर्शन नंदलाल जैन (रा.मोताळा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाण्याकडून मोताळ्याकडे जाणारा टिप्पर वाघजाळ फाट्यावरील गतिरोधकावरून जात असतांना दर्शन जैन यांची दुचाकी मागून टिप्पर वर आढळली. या अपघातात दर्शन जैन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दर्शन जैन यांना नागरिकांच्या मदतीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. मात्र तपासूनही अंतिम डॉक्टरांनी दर्शन जैन यांना मृत घोषित केले. बोराखेडी पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि टिप्पर ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.