थरारक स्टोरी..! ५० लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याला किडनॅप केले; २४ तासांच्या आत LCB आणि मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी केली सुटका..

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापुरातून एक थरारक घटनाक्रम समोर आला आहे. ५० लाखांच्या खंडणीसाठी गुजरात येथील एका व्यापाराचे मलकापुरातील दसरखेड एमआयडीसी परिसरातून अपहरण झाले होते. या व्यापाऱ्याची अशोक लांडेंच्या नेतृत्वातील LCB ने सुखरूप सुटका केली आहे..विशेष म्हणजे अपहरण झाल्यानंतर २४ तासांच्या आत ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात मधील व्यापारी अली भाई अकबर भाई हे मलकापुरातील दसरखेड एमआयडीसीतील अनंत कृपा पेपर मिल येथे एका व्यावसायिक डील साठी आले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून ४ जणांनी अकबर भाई यांचे जबरदस्ती अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी अकबर भाई च्या मुलाला फोन करून ५० लाख रुपये आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी धमकी दिली होती. यानंतर तातडीने अकबर भाईंच्या मुलगा आसिफ अली यांनी मलकापूर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील देण्यात आली, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला देखील यासंदर्भातील तपास करण्याचे निर्देश दिले. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सिल्लोड मधील अंधारी येथून अली भाई अकबर भाई यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या शेख मुश्ताक शेख इलियास, अनिस युनूस पटेल, हक्कानी जिल्लानी पटेल आणि शेख शाहिद शेख सईद यांना अटक केली आहे...
जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, सपोनी रुपेश शक्करगे, आहेत 
 पोहेकॉ संदीप पवार, संदीप सपकाळ, दिलीप चव्हाण, बालाजी सुरडकर, गणेश पाटील, दिगंबर कपाटे , पुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली...