बोराखेडीच्या नव्या ठाणेदारांना चोरट्यांचा सॅल्यूट! शेलापूर खुर्द मध्ये एकाच रात्री फोडली दोन घरे...
Jun 27, 2025, 08:57 IST
मोताळा (अक्षय थिगळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील शेलापूर खुर्द येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरांमध्ये घुसून ३ लाख ५५ हजार ५०० किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २५ जूनच्या रात्री घडली होती. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेलापूर येथील रहिवासी सचिन सुधाकर पाटील हे कुटुंबासह झोपले असताना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्यावर त्यांना घरातील कपाट उघडे दिसले. पत्नीला जागे करून पाहणी केली असता कपाटातील लॉकरमधून सुमारे १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांच्याच घराशेजारी असलेल्या विजय दामोदर पाटील यांचे कुटुंब पुण्याला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्या घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख १ हजार किमतीचे दागिने चोरून नेले. असे एकूण दोन्ही घरातील ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले आहे या प्रकरणी सचिन सुधाकर पाटील यांच्या फिर्यादिवरून बोरखेडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोड्या या घटनान मध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, मात्र आता नव्याने रुजू झालेले ठाणेदार सिताराम मेहेत्रे हे वाढत्या चोरीच्या घटनांनवर आळा घालतील अशी आशा आता नागरिकांन मध्ये आहे.