देऊळगाव राजात चोरट्यांचा धुडगूस! रातोरात फोडले इलेक्ट्रिकचे दुकान! हजारोंचा मुद्देमाल लंपास..
शहरातील आठवडी बाजार गल्लीत नगरपरिषदेच्या कॉम्प्लेक्स मध्ये असलेले एक इलेक्ट्रिकल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. यामध्ये २३ हजारांचा मुद्देमाल ऐवज लंपास केला. १८ जुलैच्या रात्री तेथील दत्तात्रय मेहेत्रे यांच्या दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. दुकानातील इलेक्ट्रिक साहित्याची नासधूस केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर, २३ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समजले. मागील काही दिवसांपासून देऊळगाव राजा शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीच्या विविध घटना घडल्या असून, रातोरात शहरातील दुकाने फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. यामुळे शहरातील व्यापारी वर्गात चोरट्यांनी दहशत निर्माण केली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.
साहेब! रात्रीची गस्त महत्त्वाची..
दरम्यान, अशा वाढत्या घटनांमुळे देऊळगाव राजा पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढविली पाहिजे. जेणेकरून चोरी , घरफोडी अशा घटनांवर अंकुश बसेल. वाढत्या गुन्हेगारीला देऊळगाव राजा पोलिसांनी आळा घालावा अशी आर्त मागणी शहरवासीयांनी केली आहे.