लग्नात नाचता नाचता वाद झाला! चार पाच जणांनी मिळून एकाला खुपसले... खामगावात मर्डर...! 

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावातल्या बर्डे प्लॉट भागात २५ एप्रिलच्या रात्री तुफान राडा झाला. लग्नात नाचता नाचता वाद होऊन त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले..४ –५ जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

प्राप्त माहितीनुसार शोएब खान आमिर खान असे मृतकाचे नाव असून तो २३ वर्षांचा होता. काल २५ एप्रिलला बर्डे प्लॉट भागात एक लग्न होते. डीजेच्या तालात तरुण नाचत होते, त्यात शोएब खान देखील नाचत होता.
नाचता नाचता धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला, त्यात शोएब वर काही जणांनी हल्ला केला, रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झालेल्या शोएबला खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. खामगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.