घराचे कुलूप तोडून चोरी; ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून केले पोलिसांच्या हवाली; डोणगाव परिसरात चोरीच्या घटना वाढल्या. .!
Sep 18, 2025, 13:25 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अकोला ठाकरे गावात घरफोडी करून चोरी करणाऱ्या चोराला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी रामदास आव्हाड (वय ४८, रा. उदनापूर, ता. लोणार, जि. बुलडाणा) याने फिर्यादी बाळकृष्ण साहेबराव ठाकरे (वय ३९, व्यवसाय-शेती, रा. अकोला ठाकरे) यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्याने घरातील कपाट फोडून त्यामधील जुना Vivo कंपनीचा मोबाईल (सिमकार्ड नसलेला, किंमत सुमारे ₹५,०००/-) तसेच रोख रक्कम ₹१,८००/- असा एकूण ₹६,८००/- किमतीचा मुद्देमाल चोरला.
दरम्यान, चोरीची बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३) भा. नि. सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हे.का. कैलास गाडवे करीत आहेत.