पाेलिसांवर दबाव टाकण्यासाठी युवकाने विष घेतले; किनगाव राजाचे ठाणेदार संजय माताेंडकर यांचे स्पष्टीकरण...
लिंगा देवखेड येथील पवन प्रल्हाद जायभाये या युवकाने आपली बैलजाेडी चाेरी गेल्याची तक्रार किनगाव राजा पाेलिसात दिली हाेती. तसेच कारवाई हाेत नसल्याने तसेच ठाणेदारांनी मारहाण केल्याचा आराेप करीत पवन जायभाये याने विष प्राशन केले हाेते. या घटनेवर किनगाव राजाचे ठाणेदार संजय माताेंडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, प्रल्हाद जायभाये आणि पवन जायभाये हे गावात कापूस खरेदीचा व्यवसाय करतात. या बापलेकांकडे अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे आहेत. कापसाच्या व्यवहारातून जऊळका येथील कारभारी सांगळे यांना बैलजाेडी देण्यात आली हाेती. आर्थिक व्यवहार वाटल्याने हे प्रकरण तपासात ठेवले हाेते.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने पवन जायभाये युवकावर फसवणुकीचा गुन्हे दाखल हाेणार आहेत. या गुन्ह्यांमुळे घाबरलेल्या पवनने पाेलिसांवर दबाव टाकण्यासाठी विष प्राशन केल्याचेही ठाणेदार संजय माताेंडकर यांनी म्हटले आहे. या युवकाकडे अने शेतकऱ्यांचे पैसे असून ही रक्कम लाखात आहे. पाच ते सहा शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात वाढ हाेण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.