तार तुटला, शॉट सर्किट झाले! हातनीत शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून खाक! लाखोंचे नुकसान....आज सकाळची घटना
Apr 26, 2026, 12:24 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तार तुटून शॉट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून खाक झाला. चिखली बुलडाणा रस्त्यावरील हातणी शिवारात ही घटना समोर आली.आज,रविवार २६ एप्रिलच्या सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार हातणी येथील शेतकरी विश्वनाथ गणपत जाधव यांची चिखली बुलडाणा रस्त्यावर हातणी शिवारात शेती आहे. येथील गट नंबर ३४ मधील त्यांनी ऊस लागवड केलेली होती. ऊस लागवड करून उन्हाळ्यात त्याचा वापर ते रसवंतीचा व्यवसाय करण्यासाठी करतात. त्यांच्या शेतातून महावितरणची वीज वाहिनी जाते.
आज सकाळी वीज वाहिनीचा तार तुटल्याने एक एकर ऊस जळून खाक झाला. आगीची तीव्रता एवढी होती की विझवणे शक्य नव्हते..दरम्यान यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून महावितरण ने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समोर येत आहे.