डाेणगाव परिसराचे चाेऱ्यांचे सत्र थांबता थांबेना; आता विठ्ठलवाडी, शेलगाव देशमुख येथेही घरफाेडी; पाेलिसांनी रात्रीची गस्त सुरू करण्याची मागणी !

 
डाेणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डाेणगावसह परिसरात गत दाेन ते तीन दिवसांपासून चाेऱ्यांचे सुरू असलेले सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. डाेणगावात दाेन घरांमध्ये चाेरी झाल्यानंतर आता विठ्ठलवाडी आणि शेलगाव देशमुख येथेही घरफाेडी झाल्याची घटना १२ सप्टेंबर राेजी उघडकीस आली आहे. वाढत्या चाेरीच्या घटनांमुळे, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी हाेत आहे. 
 


 डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम शेलगाव देशमुख येथील शामराव जायकू अवगळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले हाेते. १२ सप्टेंबरच्या दुपारी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप चाबीने खोलून नंतर घरात प्रवेश केला घरातील धान्य ठेवण्याच्या कोठीला असलेले कुलूप न तोडता कोंडा मोडून त्यात ठेवलेले गहू मण्याची पोथ सोबतच कानातले झुमके व नगदी तेरा हजार असा अंदाजे तीन लाखाचा एवज लंपास केला. चाेरट्याने घराच्या मागचा दरवाजा उघडून पळ काढला. नेहमीच मागचा दरवाजा बंद असतो तो आज उघडा असल्यामुळे शंका आल्याने त्यांनी आजू बाजूला विचारणा केली असता चोरी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच डाेणगाव पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून पंचनामा केला. 

डाेणगावात दुकान फाेडण्याचा प्रयत्न, चाेरट्यांचे पाेलिसांना आव्हान 
डोणगाव येथील बसस्थानकावर असणार्‍या जैस्वाल कलेक्शन हे दुकान १२ सप्टेंबर ला रात्री २.३० च्या दरम्यान  फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. परंतु, चाेरट्यांना यश आले नाही.  मात्र चोरट्याने सिसिटीव्हीमध्ये स्वत:चा चेहरा दाखवून चक्क पोलीसांना आव्हान दिले.त्यामुळे, डोणगाव येथे पोलीसांचा वचक राहीला नसल्याचे दिसून येते. डोणगांव ते मेहकर राज्य महामार्गोवर नियम डावलून रात्री उशिरापर्यंत हॉटेल धाबे सुरू असतात. त्यामुळे वर्दळ असते याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. तर केवळ पोलीस गाडीतून फिरुन गस्त न घालता डोणगाव येथील पोलीसांनी रात्री पायी फिरून प्रत्येक वार्डोत गस्त घालावी अशी मागणी होत आहे.