अल्पवयीन गतिमंद मुलगी संडासला जात होती; भामट्याने हात पकडून झोपडीत ओढले अन् नको ते केले! आता कर्माची फळे भोगावी लागणार; घटना मलकापूर तालुक्यातील...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने दणका दिला आहे. आरोपी नराधमाला आता कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. २० वर्षे सश्रम कारावास आणि १२ हजार रुपये दंड अशी शिक्षा मलकापूर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश एस. व्हि. जाधव यांनी सुनावली आहे.

  घटना २०२२ ची आहे. अल्पवयीन गतिमंद मुलगी संडासला जात होती. त्यावेळी नराधम आरोपी सुरेश भगवान संबारे याची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने पीडित मुलीचा हात पकडून तिला झोपडीत ओढले. तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोषारोप पत्र दाखल करून सदर प्रकरण स्पेशल केस म्हणून चालवण्यात आले. आरोपी हा अटकेपासूनच कारागृहात होता. 
सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी पीडिता, डॉक्टर, पीडितेची आई आणि तपास अधिकारी यांची साक्षर विशेष महत्त्वाची ठरली. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. शैलेश जोशी यांनी प्रभावी युक्तिवाद केला.