प्रेमाचा धक्कादायक शेवट ! प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या; खामगावातील सजनपूरी भागातील हाॅटेलमधील थरारक घटना; प्रेमी युगुल साखरखेर्डा येथील..!
Updated: Sep 23, 2025, 22:02 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना खामगावच्या सजनपुरी भागातील नाक्यावर हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री ८.३० वाजता उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.साहिल उर्फ सोनू राजपूत आणि पायल पवार रा. साखरखेर्डा असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरखेर्डा येथील साेनू राजपूत आणि पायल पवार यांचे दाेन वर्षांपासून प्रेमसंबध हाेते. ते नेहमी खामगाव शहरातील सजनपुरी भागात असलेल्या हाॅटेल जुगनूमध्ये ते दोघे नेहमी भेटत हाेते.
दरम्यान, मंगळवारी ते नेहमीप्रमाणे या हाॅटेलमध्ये आले हाेते. त्यांच्यामध्ये कुठल्याही विषयावर वाद झाला. त्यानंतर साेनू राजपूत याने पायल पवार हीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. हाॅटेल कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी याविषयी पाेलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे खामगाव शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणी पुढील तपास पाेलीस करीत आहेत.