समृद्धीवरील दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या! तब्बल १४ गुन्ह्यांची उकल करण्यास एलसीबीला मोठे यश; ३ आरोपी मध्यप्रदेशातील तर ५ जालना जिल्ह्यातील..
Jun 29, 2024, 13:59 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील काही दिवसांपूर्वीच जलंब येथील जबरी चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यशस्वी ठरले होते. तशीच पुनरावृत्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कामगिरीतून झाली आहे. समृद्धीवरील दरोडे, जबरी चोरी, घरफोडी अशा १४ गुन्ह्यांची उकल करत ९ जणांना पोलिसांनी अटक केली.
Advt.👆
समृद्धी महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांना लुटण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला. धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशाने याबाबत डोणगाव पोलीस ठाण्यात १० मे रोजी तक्रार दिली होती, तपास चक्रे सुरू होते. परिसरातील घरफोडी, व समृद्धी महामार्गावरील जबरी चोरी, डिझेल चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक गठित करण्यात आले. समृद्धी महामार्गावरील झालेल्या घटनेमध्ये प्रवाशाचा १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना होते. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती या आधारे सदर गुन्ह्यात जालना जिल्हा व मध्य प्रदेश राज्यातून पोलिसांनी आरोपींना उचलले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच इतर घरफोडी व चोरीच्या प्रकरणातून काही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे.
अटल चोरट्यांची नावे!
समीर नूर मोहम्मद मेव (२५)वर्षे , राकेश गुजल चंदेल (२१वर्षे), धरमराज विक्रम हरीजन (१९ वर्षे) तिघे राहणार दुपाडा ता.जि. शहाजापूर, मध्य प्रदेश राज्य, रावण ऊर्फ अभिषेक प्रताप गवारे (२१ वर्षे) रा. साडे सावंगी, ता. अंबड जि. जालना, रंगनाथ बाजीराव डनडे (२५ वर्ष) वर्षे रा. जालना,
संतोष अंबादास वाघमारे (२४ वर्ष), विक्रम गोपाल राजपूत वय ३१ (वर्ष) रा. जालना, राहूल राधाकिसन कोकाटे (२१ वर्ष), जावेद हबीब मुल्लानी (२९ वर्ष) दोघे राहणार गोरखेड जिल्हा जालना.
कामगिरी पथक!
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकसुनिल कडासने , अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, आशिष चेचरे, उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार, सचिन कानडे, रवि मोरे, पोलीस अंमलदार, रामविजयसिंग राजपूत, पंकज मेहेर, शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, दिपक वायाळ, जगदेव टेकाळे, गजानन गोरले, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, वैभव मगर, विक्रांत इंगळे, सुनिल मिसाळ, अमोल शेजोळ, विजय सोनोने, अनंता फरताळे, राजेंद्र अंभोरे, गजानन माळी, दिगंबर कपाटे, मनोज खरडे, चालक पोलीस अंमलदार सुरेश भिसे, समाधान टेकाळे, विलास भोसले व ईतर पोलीस अंमलदार, हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, ऋषी खंडेराव, तांत्रीक विष्लेषण विभाग, सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा यांचे
पथकाने पार पाडली.