विकृतीचा कळस! दुसऱ्याचं चांगल दिसत नव्हत,जळक्याने उपटली कपाशीची ४०० झाडे;
लोणार तालुक्यातील मांडवा येथील घटना..!
Jun 28, 2024, 21:33 IST
लोणार (जयजित आडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मायबाप शेतकरी मोठ्या काबाडकष्टाने शेती फुलवतात. पण ही 'फुलवाडी' काही जळक्यांना असह्य होते. लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात एका विकृत मनोवृत्तीच्या जळक्या माणसाला दुसऱ्याचं चांगल दिसत नव्हत..त्यामुळे त्याने कहरच केला..शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या कपाशीची ४०० झाडे भामट्याने उपटून फेकली..यातून त्या भामट्याला काय मिळालं काय माहीत..पण शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले..याप्रकणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मांडवा शिवारातील शेतात मंदा इंगळे यांनी कापूस लावला होता. शेतातील कामकाज आटोपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी शेतात गेल्या अन् जे दृश्य दिसले ते पाहून मंदा इंगळे यांच्या पायाखालची जमीन सरकली.. कारण काबाडकष्टाने लावलेल्या कापसाची ४०० झाडे कुणीतरी उपटून नेली होती. त्यांच्या शेतातील उत्पादनावर करडी नजर ठेवून द्वेष भावनेने रातोरात ४०० झाडे उपटल्याचा हा प्रकार उघडकीस आला. मंदा इंगळे यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, २६ जुनच्या रात्री ही चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.