अपहरण झालेल्या बालिकेचा लावला शोध; बुलढाणा पोलिसांची संयुक्त कारवाई; पिंपरी-चिंचवड येथून आरोपीसह घेतले ताब्यात...
या मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन डोणगाव येथील कलम 363 भादंवि मधील पिडीत बालिकेचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंगोरे (वय 22, रा. पाटमोरी, ता. मेहकर) हा पिडीत बालिकेसह चाकण, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला प्राप्त झाली होती.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक व तांत्रिक विश्लेषण विभाग यांच्या पथकाने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन महाळुंगे एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या सहाय्याने संयुक्त कारवाई केली. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक पडताळणीच्या आधारे पथकाने पिडीत बालिका व आरोपीला शोधून ताब्यात घेतले.
त्यानंतर दोघांना डोणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन डोणगावमार्फत सुरू आहे.
ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक, बुलडाणा, डी. एन. लोढ – अपर पोलीस अधीक्षक, खामगाव,अनिल गायकवाड – अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा,पोनि सुनील अंबुलकर – प्रभारी अधिकारी, स्थानीक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात पोउपनि संजय ठाकरे, पोहेकॉ संभाजी असोलकर, पोहेकॉ सना खेडेकर, चालक पोकॉ सचिन शेंद्रे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, बुलडाणा),
पोहेकॉ राजु आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलडाणा) यांनी केली.